उर्मिला सतीश लोटके यांचे अल्पशा आजाराने निधन

अहिल्यानगर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष श्री. सतीश लोटके यांच्या सहचारिणी, नगरच्या नाट्य क्षेत्रात सदैव हिरीरीने सहभागी होणाऱ्या रंगकर्मी, बालरंगभूमी परिषद, अहिल्यानगर शाखेच्या माजी अध्यक्षा, मनमिळावू व हसतमुख स्वभावाच्या आदरणीय सौ. उर्मिला सतीश लोटके यांचे आज रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.nidhan varta in marathi

नगरच्या नाट्यचळवळीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने रंगभूमी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

आदरणीय वहिनींना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर सतीशदादा व संपूर्ण लोटके परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.

अंत्यविधी सोमवार, दि. – १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता खंडाळा, दौंड रोड, ता. नगर (अरणगावच्या पुढे) येथे होईल…

Leave a Comment